परंडा : प्रतिनिधी
शहरातील अवैध कत्तलखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.२०) धाड मारली. यामध्ये ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार परंडा शहरात सिकलकर गल्ली परिसरात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो. उपनिरिक्षक संदिप ओहळ, पोलिस अमलदार वलीउल्लाह काझी, विनोद जानराव, नितीन जाधवर, योगेश कोळी सह पोलिस मुख्यालयातील अती जलद पोलिस पथकातील अमलदारांनी स. ९.३० वाजेच्या सुमारास परंडा येथील अवैध कत्तलखान्यावर धाड मारली. यामध्ये ५ टन गोमांस किंमत १० लाख रुपए तसेच चार पिकअप वाहन, २ आयशर टेम्पो असा एकूण ४२ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी जाकीर हुसेन गुलाम गणी, आशपाक बेपारी राहणार इंदापूर व फाजील सौदागर, ऐराब सौदागर, ओवेस सौदागर सह इतर १० ते १२ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याकामी परंडा पो.नि. विनोद इज्जपवार, स.पोनि. कवीता मुसळे, पोलिस अमलदार नितीन गुंडाळे, भुजंग अडसूळ, योगेश यादव, रफीक मुलाणी, सुर्यजित जगदाळे, म.पोलीस अमलदार अर्चणा भोसले यांनी सहकार्य केले.