लातूर : प्रतिनिधी
परभणी येथे एका समाजकंटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिमेची केलेली विटंबना ही अत्यंत निंदनीय घटना आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने दि. १२ डिसेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची भेट घेऊन या घटनेमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांची सखोल चौकशी करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन दिले.
परभणी येथे घडलेल्या या अमानवी कृत्यामागे जे कोणी सुत्रधार असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी. या घटनेमुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याची ग्वाही द्यावी. समाजातील सामाजीक सलोखा, शांतता बिघडवाणा-या अशा घटना घडू नयेत, महापुरुष आणि लोकशाहीच्या प्रतिकांचादेखील अपमान व्हायला नको, याकरीता काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्यात यावे, अशा सुचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांची गुरुवारी भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी लातूर शहर काँग्रेसचे माजी नगरसेवक व निराधार विभागाचेअध्यक्ष असिफ बागवान, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, प्रदेश पदाधिकारी संजय ओव्हाळ, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने प्रा. प्रवीण कांबळे, प्रभाग अध्यक्ष अॅड. विजय गायकवाड, सिराज शेख, राजू गवळी, फारुख शेख, बिभीषन सांगवीकर, पिराजी साठे, अॅड. गणेश कांबळे, कुणाल शृंगारे, असलम चाऊस, नितीन कांबळे, काशिनाथ वाघमारे, अशोक सूर्यवंशी, अक्षय मुरुळे, दयानंद कांबळे, मंगेश वैरागे, किरण बनसोडे, अजित सूर्यवंशी, संजय देडे, मारुती चव्हाण, आनंद बनसोडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.