15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रपवार साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यांच काय? : गायत्री शिंगणे

पवार साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यांच काय? : गायत्री शिंगणे

डॉ. शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांचा सवाल

सिंदखेड : सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पुनश्च शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांची पुतणी असलेली गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांना सवाल केला आहे. शरद पवार साहेब…! निष्ठावंतांचं काय…? असा सवाल करत गायत्री शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदार संघातून अपक्ष लढणारच असल्याचा दावाही केला आहे. कालच मी शरद पवार साहेबांची वाय बी सेंटर येथे भेट घेतली असता त्या ठिकाणी डॉक्टर शिंगणे यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याचा कुठेही सुतवाच नव्हता. मात्र आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. हरकत नाही मी सिंदखेडराजा मतदारसंघातून अपक्ष लढणारच असल्याची पहिली प्रतिक्रिया गायत्री शिंगणे यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घरवापसी केली आहे. ते आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. याच मुद्यावरुन पुतणी गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर जोरदार टीका केली. साहेब तुम्हाला माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी असे म्हणत गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे सिंदखेड राजा मतदार संघाचे आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाल्याने सिंदखेड राजा येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळासमोर फटाके फोडून जल्लोष केला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनी मिठाई देखील वाटप केली. आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे असे असले तरी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांनी देखील याच मतदारसंघातून अपक्ष लढणारच असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे सिंदखेड राजा मतदार संघात काका विरुद्ध पुतणी असा सामना रंगणार असल्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR