लातूर : प्रतिनिधी
चैत्राच्या उन्हापूर्वीच सध्या उन्हाची तिव्रता ग्रामीण भागात दिवसागणीक हाळू-हाळू वाढताना दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पशुधनास व नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाई जानवणा-या २५४ गावे व वाडयांना अधिग्रहणाद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करवठा करावे अशी प्रस्ताव दिले होते. त्यानुसार जिल्हयातील ९८ गावे व वाडयांना ११० अधिग्रणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
गेल्यावर्षी जिल्हयात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी जिल्हयात जानेवारीपासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. सध्या नद्या, नाले, विहिरी कोरडया पडल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाई जाणवणा-या ग्रामपंचायतींनी २१७ गावे, ३७ वाडया यांना ३३३ अधिग्रहणाच्या पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे करण्यात आले आहेत. सदर प्रस्तावांची पाहणी करून तहसिल कार्यालयाकडे १५२ गावे व २७ वाडयांना २१३ अधिग्रहणाची गरज कळवण्यात आली होती. त्यानुसार तहसिल कार्यालयांनी ७८ गावे, २० वाडयांना ११० अधिग्रहण मंजूर केले आहेत.