27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडापॅरालिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी पदकांचा चौकार

पॅरालिम्पिकमध्ये पहिल्याच दिवशी पदकांचा चौकार

१ सुवर्ण, १ रोप्य, २ कांस्य पदकांची कमाई
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला फारशी कमाल करता आली नाही. परंतु आता पॅरालिम्पिक स्पर्धेत आज पहिल्याच दिवशी भारतीय क्रीडापटूंनी दिमाखदार कामगिरी बजावत चार पदकांची कमाई केली. यामध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.

सर्वप्रथम भारतीय नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण कमाई केली तर याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने कांस्य पदक जिंकले. अवनीने फायनलमध्ये २४९.७ गुण मिळवत नव्या विक्रमाला गवसणी घातली. तिने २०२० मध्ये टोकियो येथील स्पर्धेत गोल्ड मेडल आणि ब्रांझही पटकावले होते. यावेळी तिने पुन्हा गोल्ड मेडल जिंकले. गतवर्षी चॅम्पियन बनलेल्या अवनीने ६२५.८ स्कोर केला तर दोनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मोना अग्रवालने आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत ६२३.१ स्कोअर केला होता. भारताला तिसरे पदक प्रीती पालने मिळवून दिले. प्रीतीने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्पदक पटकावले, तर चौथे पदक भारताच्या मनीष नरवालने मिळवून दिले. नरवालेने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक पटकावले. भारताने आतापर्यंत रौप्यपदक पटकावले नव्हते. ही कसर मनीषने भरून काढली.

अवनीने दुस-यांदा
पटकावले गोल्ड मेडल
अवनीने ३ वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एसएच १ मध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यामुळे तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत होता. कार अपघातात जखमी झाल्यानंतर अवनी सातत्याने व्हिलचेअरचा वापर करत होती. अपघातातून सावरत तिने पुन्हा एकदा गोल्ड मेडल पटकावण्याचा पराक्रम करून दाखवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR