मुंबई : उमेदवारांनी प्रचारासाठी दिवाळीचा वापर करण्याचे तंत्र अंगिकारले आहे. थेट सणाच्या दिवशी कार्यकर्त्याच्या मतदारांच्या दारात जाऊन रोष ओढवून घेण्याऐवजी दिवाळी सणाच्या नावाखाली चाळी, सोसायटींमधील कार्यक्रमाला हजेरी लावण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येत आहे. निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी दिवाळी सणाच्या दिवशी कशा पद्धतीने प्रचार करावयाचा यासाठी क्रिएटिव्ह टीमच्या खास बैठकाही आयोजित केल्या आहेत.
घरोघरी जाऊन प्रचार करणे हे सर्वच उमेदवाराचे लक्ष्य असून, ते नियोजन ४ नोव्हेंबरला करणार असल्याचे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ख-या अर्थाने किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याचे स्पष्ट होईल.