19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeसोलापूरप्रतिकात्मक ईव्हीएम मशिनला सलाईन लावून गादेगावकरांचे आंदोलन

प्रतिकात्मक ईव्हीएम मशिनला सलाईन लावून गादेगावकरांचे आंदोलन

पंढरपूर: विधानसभा निवडणूक निकालानंतर मारकडवाडीनंतर आता पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशिनच्या विरोधात उठाव केला आहे. येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशिनला सलाईन लावून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. आता गावोगावी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू झाली आहेत.

महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील उमेदवारांनी ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील काही लोकांनी ईव्हीएम मशिनवर शंका घेत बैलेट पेपरवर फेर चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे येथील ग्रामस्थांना चाचणी मतदान घेण्याचा निर्णय मागे घेतला. याचाच भाग म्हणून गादेगाव येथील काही गावकऱ्यांनी एकत्रित येत प्रतिकात्मक ईव्हीएम मशिनला सलाईन लावून आंदोलन केले.

यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते रणजित बागल म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत सामान्य जनतेमध्ये अनेक शंका आहेत. मशिनवर जनतेचा भरवसा उरलेला नाही. ईव्हीएम मशिनला उपचाराची गरज आहे म्हणून सलाईन सावून आंदोलन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल, मनसेचे अनिल बागल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

दोन दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी फेर चाचणी मतदान घेण्याची तयारी केली होती. परंतु प्रशासनाच्या विरोधानंतर फेर चाचणी मतदान रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर आता गादेगाव येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशिनच्या विरोधात आंदोलन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR