24.1 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रफुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले; ३ ठार ,६ जखमी

फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले; ३ ठार ,६ जखमी

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल रात्री फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले, त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोलीच्या केसनंद नाका येथील पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली.

पुण्यातील वाघोली येथील केसनांद फाट्यावर रात्री १२.३० च्या सुमारास हा अपघात झाला. डंपर चालक दारूच्या नशेत होता, अशी प्राथमिक माहिती आहे. ठार झालेल्यांमध्ये वैभव रितेश पवार (वय २ वर्षे) आणि रिनेश नितेश पवार (वय ३ वर्षे) या दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे, तर इतर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी (२२ डिसेंबर) रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण १२ जण झोपले होते.

बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले. आरडाओरडा ऐकू आल्यावर आजूबाजूचे लोक पीडितांना वाचवण्यासाठी धावले. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला पण काही तासांतच पोलिसांच्या एका पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी डंपर चालकाचे नाव गजानन शंकर तोट्रे, (२६ वर्षे) असे असून तो मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. तसेच त्याला बैद्यकीय तपासणीसाठीही पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहापैकी तिघांची प्रकृती अत्यंत वाईट असल्याचे सांगण्यात येत आहे. डंपरमध्ये चिरडलेले सर्वजण मजूर होते. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश होती. दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीचे जेवण करूनते सर्वजण फूटपाथच्या कडेला झोपले होतो. काही मजुरांची कुटुंबेही येथे झोपली होती. प्राथमिक तपासात हे डंपर वाघोली, पुणे येथील रहिवासी केसनंद नाकप्पर यांच्या मालकीचे भार्गव बिल्टवेज एंटरप्रायझेसचे असल्याचे समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR