16.8 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरबराजमुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ

बराजमुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ

लातूर : एजाज शेख
मांजरा, तेरणा व रेणा या नद्यांवरील एकुण २७ बराजमध्ये पुर्ण क्षमतेने १०० टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे. बराजेसची शृंखला जलमय झाल्याने सिंचन क्षेत्रात सुमारे १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. या २७ बराजमध्ये आजघडीला ८०.३ टक्के पाणी साठले आहे. त्याचा फायदा शेतक-यांना होत आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजनेसाठी शाश्वत स्त्रोताच्या निश्चितीकरणासाठी उच्चाधिकारी समितीची नियुक्ती केली होती. उच्चाधिकार समितीने मांजरा नदीवर मांजरा धरणाच्या खालील बाजूस १००.०३ दलघमी पाणी उपलब्ध केल्यानूसार बोरगाव-अंजनपूर, वांजरखेडा, कारसा-पोहरेगांव, खुलगापूर, डोंगरगाव, धनेगाव येथे सहा बंधारे व तावरजा नदीवर भूसणी येथे एक असे एकुण सात बंधा-यांसाठी एकुण ७७.२३ दलघमी पाणी वापरण्याचे प्रस्तावित केले होते.

उच्चाधिकार समितीने प्रस्तावित केलेल्या पाण्याचे प्रत्यक्ष पाणीवापराचे फेरनियोजन करुन मांजरा नदीवर साई-महापूर, शिवणी, टाकळगाव-देवळा, होसून तालुका निलंगा तसेच लासरा तालुका कळंब येथे नवीन बॅरेजेस् प्रस्तावित करण्यात आले होते. मांजरा खो-यात अनियमित व अवेळी पडणारा पाऊस यामुळे कोल्हापूरी बंधा-यांमध्ये मनुष्यबळाने वाहत्या पाण्यामध्ये दरवाजे टाकण्याचे जिकिरीचे व अडचणीचे काम होते. कोल्हापूरी बंधा-यांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा करता येत नव्हता. त्यामुळे परीसरात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. ही बाब लक्षात घेता कोल्हापूरी पद्धतीच्या बंधा-यांच्याद्वारांमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा करुन बॅरेजेप्रमाणे उभ्या उचल पद्धतीचे विद्युत संचलीतद्वारे बसवून बॅरेजेमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

त्यास मंजूरी मिळाली आणि महाराष्ट्रात प्रथमच मांजरा नदीवरील बिंदगीहाळ, नागझरी, वांगदरी या तीन कोल्हापूरी बंधा-यांचे बॅरेजच्या धर्तीवर रुपांतर करण्यात आले. त्यामुळे बंधा-यांमध्ये पुर्ण क्षमतेने १०० टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे. बराजेसची शृंखला जलमय झाल्याने सिंचन क्षेत्रात सुमारे १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मांजरा नदीवरील १५, तेरणा नदीवरील ७ व तेरणा नदीवरील (समन्वय कार्यालये प्रकल्प) २ असे एकुण २७ बराजमध्ये ६२.२६७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८०.३ टक्के पाणीसाठा आहे.

विलासरावजी देशमुख यांच्यामुळेच जिल्हा जलमय
मांजरेच्या वाहत्या पाण्याला दूथडी अडवून उभय तिरावरील तृषार्त भूमीला सुजलाम् सुफलाम् करण्याचे अभिनव स्वप्न विकासरत्न विलासराव देशमुख यांनी पाहिले आणि ते स्वप्न साकारले केल्याने मांजरा नदीवरील बराज आजघडीला शेतक-यांसाठी शाश्वत स्त्रोत बनले आहेत. मांजरा, तेरणा व रेणा नद्यांवरील एकुण २७ बराजमध्ये एकुण पाणीसाठा ६२.२६७ दशलक्षघनमीटर लघमी म्हणजेच ८०.३ टक्के पाणी साठले आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दुरदृष्टीमुळेच मांजरा, तेरणा व रेणा नद्यांच्या पट्टा जलमय झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR