29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeराष्ट्रीयबनावट पासपोर्टचे रॅकेट उघडकीस

बनावट पासपोर्टचे रॅकेट उघडकीस

५ लाख रुपये घेऊन बनवला जायचा पासपोर्ट
कोलकाता : वृत्तसंस्था
बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिक करून बनावट पासपोर्टद्वारे परदेशात पाठवणा-या मनोज गुप्ताला पश्चिम बंगालच्या पोलिसांनी अटक केली. ५ लाख रुपये घेऊन तो बनावट पासपोर्ट बनवत होता. त्याने बांगलादेशी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार कार्ड यांसारखी भारतीय कागदपत्रे मिळण्याची व्यवस्था केली होती. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. बनावट पासपोर्ट आधारे त्याने १०० पेक्षा जास्त लोकांना बांगला देशात पाठविले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बनावट पासपोर्ट बनवणा-या टोळीचा मुख्य सूत्रधार मनोज गुप्ता याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली. काल रात्री पोलिसांनी त्याला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गायघाटा पोलिस स्टेशन हद्दीतील चांदपाडा येथून अटक केली. तो दहा वर्षांहून अधिक काळ टूर-ट्रॅव्हल व्यवसायाच्या नावाखाली पासपोर्ट फसवणुकीचा धंदा चालवत होता. त्याने आतापर्यंत सुमारे १०० बांगलादेशी नागरिकांना भारताचे बनावट पासपोर्ट बनवून परदेशात पाठवले होते. पासपोर्ट फसवणूक प्रकरणातील ही सातवी अटक आहे.

मनोज गुप्ता हा बनावट कागदपत्रे तयार करून पासपोर्ट बनवायचा. त्याबदल्यात त्याने लाखो रुपये घेतले. या टोळीतील समरेश व इतर जण मनोजकडे काम करायचे. शनिवारी अटक केल्यानंतर मनोज गुप्ताला अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मनोज गुप्ता बांगलादेशींसाठी बनवलेले पासपोर्ट त्याच्या टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीद्वारे परदेशात पाठवत असे. त्याने त्याच्या एजन्सीमार्फत १०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना परदेशात पाठवले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR