32.2 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeधाराशिवबर्ड फ्लूचा धोका वाढला

बर्ड फ्लूचा धोका वाढला

धाराशिव : प्रतिनिधी
धारशिवच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते.

दरम्यान, राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. वाशिम जिल्ह्यानंतर आता धारशिवमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिवच्या ढोकीमध्ये बारा कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागाने हालचाली वाढवल्या आहेत. धाराशिवच्या ढोकी परिसरामध्ये ५०च्या आसपास कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता.

धाराशिव जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणच्या ३०० पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. धारशिवच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. आता कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR