२८ जवान जखमी, निवडणुकीसाठई केले होते तैनात
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या बडगावमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणा-या बसचा मोठा अपघात घडला. निवडणुकीसाठी तैनात असलेल्या जवानांना घेऊन जाणारी बस ब्रेल गावातील खोल दरीत कोसळली. बसमध्ये ३६ जवान प्रवास करत होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. निवडमुकीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुस-या टप्प्याचे मतदान २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. २६ विधानसभा मतदारसंघात होणार असलेल्या मतदानासाठी ३६ जवानांची तुकडी रवाना होत होती. यावेळी बडगाव जिल्ह्यातील ब्रे गावानजीक दरीत कोसळून बसचा अपघात झाला. यावेळी स्थानिकांच्या मदतीने सुरक्षा दलाने बचाव कार्य हाती घेतले. जखमी जवानांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नदीत कोसळल्याने बसचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. तसेच अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.