भंडारा : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या बस फे-या लावण्यावरून चालक-वाहक आणि वरिष्ठ अधिका-यांमध्ये नेहमीच वाद होत असतात. अशाच प्रकारे बस फेरीवर चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादातून एसटी अधिकारी आणि चालकामध्ये चांगलीच फ्री स्टाईल झाली. हा संपूर्ण प्रकार भंडा-याच्या साकोली आगारात घडला.
भंडारा जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या साकोली आगारातील पंकज काटनकर असे चालकाचे नाव असून मारहाण करणारे प्रदीप करंजेकर असे अधिका-यांचे नाव असून ते वाहन परीक्षक आहेत.
चालक व वाहन परीक्षक यांच्यातील वाद व मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार साकोली बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर घडला. बस फेरीवर चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाबद्दल अद्याप कुणीही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.