36.5 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रबाबा सिद्दीकींच्या डायरीत कंबोज, परब यांची नावे

बाबा सिद्दीकींच्या डायरीत कंबोज, परब यांची नावे

तपासात धक्कादायक बाबी समोर

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये एका डायरीचा खुलासा केला आहे. झिशान सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नावे घेतली आहेत.

दरम्यान, झिशानने आपल्या स्टेटमेंटमध्ये बिश्नोई गँगचा उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी ४५०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यात २६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनमोल बिश्नोईला फरार आरोपी ठरवले आहे.

झिशान सिद्दीकी यांनी काही मोठे बिल्डर आणि विकासकांची नावे घेतली आहेत. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान व्हॉट्स अ‍ॅपवरून त्यांचे मोहित कंबोज यांच्याशी बोलणे झाले होते. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचे होते.

झिशान सिद्दीकी यांचे चार पानी स्टेटमेंट आहे. त्यात त्यांनी ज्या-ज्या बिल्डरांची नावे घेतली आहेत, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा असे म्हटले आहे. माझे वडील दोन दिवसांनी विधान परिषदेवर शपथ घेणार होते. पण त्याआधीच १२ ऑक्टोबरला त्यांची गोळी मारून हत्या झाली, असे झिशानने सांगितले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर १५ ऑक्टोबर २०२४ विधान परिषदेसाठी नामांकित केलेल्या नेत्यांनी शपथ घेतली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावर आपण समाधानी नाही हे आधीच झिशान यांनी स्पष्ट केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR