लातूर : प्रतिनिधी
आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी सखोल ज्ञान आत्मसात करावे तसेच आपले व्यक्तीमत्व सुसंस्कारीत करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करावी, असे आवाहन ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे संचालक सतीश नरहरे यांनी केले. येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी वर्गातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी नरहरे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद दुडिले होते. प्रारंभी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय मलवाउे यांनी केले. यावेळी उपस्थित असलेले इरफान हमदुले यांनी विद्यालयाच्या कामगिरीबद्दल कौतूक केले.
या प्रसंगी सुधाकर बुरगे यांनी विद्यालयाच्या नियोजनासंबंधी माहिती दिली. कार्यक्रमास पर्यवेक्षक हणमंत बैनगिरे, पुनम पाटील, शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन विश्वनाथ खंदाडे यांनी केले तर उपमुख्याध्यापक माधव क्षीरसागर यांनी आभार मानले.