25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक, रुग्णालयात दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक, रुग्णालयात दाखल

अहिल्यानगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची तब्येत अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे पिचड यांचे समर्थक आणि कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमण्यास सुरूवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पिछड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ते ८३ वर्षांचे आहेत. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर आता नाशिकच्या ९ पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली होती. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची बोलले जात आहे. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR