लातूर : प्रतिनिधी
लातुर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत रेणापूर तालुक्यातील पोहरेगावचे माजी सरपंच गंगासिंह कदम यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये केला प्रवेश केला. आमदार धिरज देशमुख यांनी त्यांचे स्वागत करुन पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बाभळगाव येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी कॉग्रेसचे रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लालासाहेब चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अभय साळुंके, सेवा दल कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, चेअरमन माणिकराव सोमवंशी, अशोक रामराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.