29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeलातूरभाजीपाला बाजारात खरेदीसाठी झुंबड 

भाजीपाला बाजारात खरेदीसाठी झुंबड 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव या जिल्ह्यात मोठ्या उत्सवात मार्गशीर्ष महिन्यातील सातव्या अमावास्येला वेळा अमावस्या हा सण साजरा केला जातो. पेरणीनंतर येणा-या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि आंध्रप्रदेश, कर्नाटकाच्या सीमा भागात वेळा अमावस्या उत्साहात साजरी करण्याची खुप जुनी परंपरा आहे. गतवर्षाप्रमाणे यंदा वेळ अमावस्या डिसेंबर महिन्यातील ३० तारखेला  आली असल्याने जिल्ह्याभरात मोठ्या उत्सहाने साजरी केली जाणार असल्यामुळे वेळा अमावस्येच्या पूर्वसंध्येला लातूरच्या भाजीपाला मंडईमध्ये भज्जी, अंबीलसाठी लागणा-या भाजीपाला खरेदीसाठी महिला वर्गानी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आली.
भारत कृषीप्रधान देश असल्याने, देशात शेतीशी संबंधीत अनके सण, उत्साव साजरे होतात. यातीलचं एक सण म्हणजे वेळ अमावस्या.        मराठवाड्यात दरवर्षी या सणाचा एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळया आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात लातूर, धाराशिव, सोलापूर आणि आंध्रप्रदेश, कर्नाटक सीमा भागात साजरा होतो. या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळया आईची पूजा करतात. तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटत असतात. वेळ अमावस्येला बोली भाषेत येळवस असेही म्हटले जाते. यावेळी शेतातील पांडवांना नवा शेंदूर लावला जातो. त्याच्या हात इतर दगडाला पुसल्यामुळे पांडवांची संख्या वाढत रहाते.  रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवीकडे प्रार्थना केली जाते.
वेळ अमावस्यानिमित्त रविवारी लातूरच्या भाजी मंडईत वांगे, दोडका, भेंडी, पत्ता कोबी, फुल कोबी, गावरान टोमॅटो, वैशाली टोमॅटो, गवार, शेवगा, पालक, शेपू, गाजर, पेरु, भोपळा, कोथिंबीर, हिरवी मिरची, काश्मिरी मिरची, वरना, वटाना, मेथी भाजी, कांदापात, लिंबु, काकडी, कारले, बटाटे, आद्रक, लसून, कांदे आदी भाजीपाल्याची मोठी आवक झाली होती. वेळ अमावस्याचे खास खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक भाजीपाला खरेदीसाठी गंजगोलाई, दयानंद गेट, राजीव गांधी चौक, पुÞ. अहिल्यादेवी होळकर चौक आदी भागांतील भाजी मंडईत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर पालेभाज्याची आवक वाढली असून त्याचे दरही कडाडले असल्याचे दिसून आले. शहरातील बाजार समितीत गेल्या काहि दिवसापासून भाजीपाल्याची आवक वाढत असली तरी दर मात्र स्थिर असल्याचे दिसून आले होत. वेळ अमास्याच्या पूर्वसंधीवर गेली दोन दिवसापासून बाजारात पालेभाज्याची आवक वाढली असूनही किरकोळ बाजारात मात्र त्याचे दर कडाडले असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR