औसा : प्रतिनिधी
तालुक्यातील भेटा येथे ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करुन खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ भादा येथे गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच औसा-मुरुड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी या घटनेची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली.
दरम्यान, औसा तालुक्यातील भेटा येथे अत्याचाराची घटना घडली असून, यातील आरोपीला तात्काळ कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. गुरुवारी भादेकरांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला. यासह आनंदनगर चौकात औसा-भादा-मुरुड राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन करुन आक्रोश व्यक्त केला.
हे प्रकरण अती जलद न्यायालयात चालवावे. यात आणखीन आरोपीचा समावेश असल्याचा संशय असून त्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावेत. पुन्हा अशा घटनाची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी पोलिसांनी प्रत्येक गावात गस्त घालण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सचिन शिवलकर, सोमनाथ बनसोडे, सचिन मुकडे, अनिल गायकवाड, जग्गू माळी, गोरख बनसोडे, अमोल पाटील, वहाब पठाण, बालाजी शिंदे, सचिन दुधभाते, मोहन बनसोडे, योगेश लटूरे, गोविंद पाटील, श्रीपत शिंदे, रेवण गायकवाड, दत्ता डोलारे, हणमंत साबळे, दिपक शिंदे, मोहन गायकवाड, जिंदावली सय्यद, संजय बनसोडे, सतिश कात्रे, उस्मान सय्यद आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
बोरगाव नं. येथे कँडल मार्च…
बोरगाव नं. येथील ग्रामस्थांनी भेटा येथील घटनेचा निषेध व्यक्त करत बुधवारी रात्री कॅडल मार्च काढला. यात ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.