25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाभारताकडून बांगला देशचा धुव्वा

भारताकडून बांगला देशचा धुव्वा

अ‍ँटिंग्वा : वृत्तसंस्था
बांगलादेशचा ५० धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियाने उपांत्य फेरीचे तिकिट निश्चित केले. लागोपाठ दोन पराभवानंतर बांगलादेशचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. बांगालदेशला आधी ऑस्ट्रेलियाने आणि आता भारताने हरवले. सुपर ८ मध्ये भारताने लागोपाठ २ सामन्यांत विजय मिळवला. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. अखेरचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे.
सांघिक खेळाच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ५० धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, विराट कोहली, जसप्रती बुमराह आणि शिवम दुबे यांनी शानदार खेळी केली. हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळी करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हार्दिक पांड्याने फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले, त्यानंतर गोलंदाजीवेळी महत्वाची विकेट घेतली.

जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ््यात बांगलादेशचे फलंदाज अडकले. जसप्रीत बुमराहने ४ षटकात फक्त १३ धावा खर्च करत दोन फलंदाजांना माघारी धाडले तर कुलदीप यादवने ४ षटकात १९ धावा खर्च करत तीन फलंदाजांची शिकार केली. हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली तर अर्शदीप सिंहने २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

भारताने दिलेल्या १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ फक्त १४६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या भेदक मा-यासमोर बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. बांगलादेशकडून कर्णधार नजिमुल शांतो याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या ओलांडता आली नाही. कर्णधार शांतोने एकाकी झुंज दिली. त्याने ३२ चेंडूमध्ये ४० धावांची खेळी केली. यात त्याने ३ षटकार आणि एक चौकार ठोकले. तंदीद हसनने ३१ चेंडूत २९ धावांची संथ खेळी केली. लिटन दास १३, तोहीत हृदर्र्य ४, शाकीब अल हसन २२, महमुदल्लाह १३, जाकेर अली १ यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस राशीद हुसेन याने विस्फोटक फलंदाजी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. राशीद हुसेनने १० चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने २४ धावांचा पाऊस पाडला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR