21 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeक्रीडाभारतापुढे पाकिस्तानचे लोटांगण! हायब्रीड मॉडेलला अखेर मान्यता

भारतापुढे पाकिस्तानचे लोटांगण! हायब्रीड मॉडेलला अखेर मान्यता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत प्रलंबीत निर्णय समोर आला आहे. अनेक संघर्ष आणि वाटाघाटीनंतर, आयसीसीला अखेर हायब्रीड मॉडेलनुसार स्पर्धा आयोजित करण्यास औपचारिक मान्यता मिळाली. आयसीसीने गुरुवारी १९ डिसेंबर रोजी याची अधिकृत घोषणा केली. आयसीसीच्या माहितीनुसार पुढील वर्षी म्हणजे २०२५ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणा-या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत.

स्पर्धेचे यजमानपद पूर्णपणे पाकिस्तानकडे राहील असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, या बैठकीत झालेल्या करारानुसार, पाकिस्तानी संघ २०२४ ते २०२७ या काळात भारतात होणा-या सर्व स्पर्धांमध्ये तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळेल, असेही जाहीर करण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आयोजनाबाबत बीसीसीआयने तेथील सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच भारत सरकारकडून आमच्या संघाला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी मिळाली नसल्याचे कळवले होते. त्यामुळे टीम इंडियाचे सामने हायब्रीड मॉडेलनुसार पाकिस्तान ऐवजी तटस्थ ठिकाणी खेळले जावेत, अशी मागणी बीसीसीआयने केली होती. अखेर आयसीसीने हायब्रीड मॉडेल स्वीकारले असून त्यावर पाकिस्तान बोर्डाचेही एकमत झाले आहे. यासोबतच २०२४ ते २०२७ या कालावधीत भारतात होणा-या आयसीसी स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचे सामनेही तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

भारतात होणा-या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ आणि भारत-श्रीलंका यांच्यात संयुक्तपणे आयोजित केल्या जाणा-या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये देखील हायब्रीड मॉडेल लागू होईल. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२८ चे यजमानपद दिले जाईल. त्या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामनेही तटस्थ ठिकाणी खेळवण्याची व्यवस्था असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२९ ते २०३१ या कालावधीत आयसीसी महिला स्पर्धांचे आयोजन करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR