मुंबई : प्रतिनिधी
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. ६ ते ७ आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपचे १३२ आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला २२ ते २४ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेला १० ते १२ मंत्रिपदं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे त्यांना ८ ते १० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीचे तिनही प्रमुख नेते यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.