पुणे : प्रतिनिधी – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीनंतर मथुरा आणि काशी तीर्थक्षेत्राचा विकास कायद्याचे पालन आणि सामंजस्याने करता येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
श्रीक्षेत्र आळंदी येथे कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मथुरा आणि काशी येथेही विकास व्हावा अशी अनेकांची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्र दौ-याबाबत अद्याप पूर्ण माहिती उपलब्ध झाली नाही असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, निवडणूक लढविण्याची अनेकांची इच्छा आहे पण याबाबत पक्षनेतृत्व अंतिम निर्णय घेणार आहे. तो सर्वांना मान्य करावा लागेल.
इंद्रायणी नदीतील प्रदूषणाबाबत विचारता ते म्हणाले, याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल.