23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरमनपाने केले ५० कोटींचे कर संकलन

मनपाने केले ५० कोटींचे कर संकलन

लातूर : प्रतिनिधी
कर संकलन व कर आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने सन २०२४-२५ या वर्ष्याच्या सुरुवातीपासूनच १०० टक्के मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवून मालमत्ताधारकासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी प्रशासनास दिलेले होते. त्यानुसार कर संकलन विभागाने दमदार कामगिरी करीत जानेवारीतच ५० कोटींंचे कर संकलन केले.
कर संकलनासाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या सुटची व शास्ती माफीची  योजना  लागू करण्यात आली होती. तसेच लोक अदालतमध्येसुद्धा प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही काही थकबाकीदार कर भरत नसल्याचे निदर्शास आल्याने जप्ती, नळ खंडन आदी कार्यवाही करण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा शास्ती माफी लागू करावी, अशी  मागणी आल्याने या वर्षातील शेवटची संधी म्­हणून दि. २५ डिसेंबर ते १० जानेवारी २०२५ पर्यंत व्­याज, शास्­तीमध्­ये ७५ टक्­के सुट देण्­याचा निर्णय मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी जाहीर केला आहे. या आर्थिक वर्षात ३५ हजार मालमत्तत्तधारकाकडून ५० कोटीचे कर संकलन हे अवघ्या काही महिन्यात करुन कर संलकन विभागातील वसुली लिपिक, पर्यवेक्षक, कर अधीक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांनी दमदार कामगिरी केली आहे. तसेच ७५ टक्के  शास्ती माफीदरम्यान मालमत्ताधारकांना कर भरणा करणे सुलभ व्­हावे या दृष्­टीकोणातून  महानगरपालिकेमार्फत दिं. ९ व १० जानेवारी रोजी शहराच्या विविध प्रभागात
मालमत्ताकर वसूली कॅम्­पचे आयोजन करण्­यात आले आहे.
सदरील कॅम्पच्या पहिल्याच दिवशी एकूण ६० लक्ष रुपयांची कर वसुली झाली असून, उद्या ७५ टक्के शास्ती माफीचा शेवटचा दिवस असून यानंतर पुन्हा सुट लागू होणार नाही  व धडक जप्ती मोहीम सुरु होणार आहे. तरी उर्वरित थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सुटचा लाभ घेऊन कर भरुन शहर विकासात हातभार लावावा व जप्ती सारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR