20.5 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित

जालना : प्रतिनिधी
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहे. २५जानेवारीपासून जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषणावर बसले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे.

जालनामधील त्यांचे अंतरवली सराटी गावामध्ये हे उपोषण सुरु होते. मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांच्या आमरण उपोषणानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनी समजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे. संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला आहे. आमरण उपोषण, आंदोलन आणि महाराष्ट्र दौरा करुन जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मराठा समाजाला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार एकतर्फी निकालाने सत्तेमध्ये आले. याचबरोबर जरांगे पाटील यांनी सडकून टीका केलेले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR