22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीमराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त १८ शिक्षकांचा गौरव

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त १८ शिक्षकांचा गौरव

बोरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. बोरीच्या कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा शिकविणा-या विविध शाळांतील १८ शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

वाचनालयाचे अध्यक्ष सौ.मिना जैन, उपाध्यक्ष पवन ओझा, सचिव बालाप्रसाद सोमानी, सूर्यप्रकाश सोनी, दीपक राजुरकर, कांता सोमानी यांनी हा उपक्रम राबविला.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणा-या शिक्षकांना अधिक चालना मिळावी यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या ज्योती उलेमाले, नीता आव्हाड, ज्योती स्वामी, मीरा आव्हाड, जिल्हा परिषद हायस्कूलच्या संगीता कदम, संतोष चिद्रवार, शिरीष बोरोले, शकुंतलाबाई कदम बोर्डीकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दिगंबर काठोळे, मंगल क्षीरसागर, साईकृपा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दीपक क-हाळे,

प्रसाद चव्हाण तर ज्ञानोपासक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख, बालाजी काळे, डी.सी .बुरकुले, राजेश ढोबळे, शिवाजी खोकले, माणिक ढोले, पंढरीनाथ लांडगे या १८ शिक्षकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास एम.डी.माटे, मुख्याध्यापक पी.बी.रांजवन, अभिजीत अंभुरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ग्रंथपाल नेमीनाथ जैन यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR