28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमला आशीर्वाद दिलात तसाच डॉ. काळगे यांना द्या

मला आशीर्वाद दिलात तसाच डॉ. काळगे यांना द्या

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद देऊन आमदार बनवले. असाच आशीर्वाद महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना देऊन त्यांना लोकसभेत पाठवावे तसेच डॉ. काळगे यांच्या प्रचारात सर्वांनी हिरीरीने, एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुरुड पंचायत समिती गणामधील विविध गावांतील काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्याशी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यानंतर निवळी (ता. लातूर) येथे पंचायत समिती गणातील निवळी, ढाकणी, बोरगाव बु., खंडाळा, गोंदेगाव, हिसोरी, त्यानंतर एकुर्गा येथे पंचायत समिती गणातील एकुर्गा, टाकळी शि., बोपला, चाटा, भोयरा, मुरुड अकोला, साखरा त्यांनतरचिंचोलीराव येथे पंचायत समिती गणातीलचिंंचोलीराव, चिंचोलीराव वाडी, विलासनगर, अंकोली, शिवूर, उटी खु., सावरगाव, धानोरी आदी गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्याशी बैठक घेवून संवाद साधला.
आमदार धिरज देशमुख म्हणाले की, केंद्र सरकारच्या तकलादू, फसव्या धोरणांमुळे उच्च शिक्षीत तरुण बेरोजगार झाला आहे. हाताला काम नाही, रोजगाराची हमी नाही. नोकरीसाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे. अशीच स्थिती देशातील शेतकरी बांधवांची आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव नाही. त्यामुळे बळीराजा हैराण आहे. महिला असुरक्षित आहेत. समाजा-समाजात वाद वाढवले जात आहेत. त्यामुळे सर्वच घटक सरकारवर कमालीचे नाराज आहेत. फोडाफोडीच्या राजकारणालाही जनता वैतागली आहे.
यावेळी काँग्रेसचे लातूर शहराध्यक्ष किरण जाधव, दिलीप नाडे, अनुप शेळके, लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, लक्ष्मण कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बी. एन. डोंगरे, ज्ञानोबा देवकर, भारत लाड, अनिल पाटील, विशाल पाटील, साजीद पटेल, गुरुनाथ गवळी, रंगनाथ माने, नारायण पाटील, श्रीनिवास शेळके, राजेंद्र मस्के, दीपक पटाडे, अभयंिसंह नाडे, ईश्वरप्रसाद चांडक, दिनेश नवगिरे, आकाश कणसे, चानू शेख, निलेश फेरे, अमर मोरे, उत्तम चव्हाण, जगन चव्हाण, प्रभू देवकर, विष्णू घुटे, लक्ष्मण तवले, प्रकाश अंधारे, पप्पू शिंदे, वैजीनाथ जाधव, बिभीषण गणापुरे, आदिनाथ गायकवाड, रामानंद जाधव, भैरवनाथ सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, नाना जाधव आदी मुरूड, निवळी, एकुर्गा आणिचिंंचोलीराव पंचायत समिती गणातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR