24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूर‘मविआ’च्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे

‘मविआ’च्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे

निलंगा : प्रतिनिधी
काँग्रेस पक्ष हा विचारांचा पक्ष आहे. विश्वासाचा पक्ष आहे. भाजपासारखा जाती-जातीत व धर्मा-धर्मात तेढ निर्माण करीत आश्वासनाची फेकाफेकी करणारा पक्ष नाही तर काँग्रेसने कर्नाटक राज्यात निवडणुकी दरम्यान जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण करून जनतेला अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तुमचा उत्साह, क्रियशिलता व जोश पाहता महाराष्ट्रात माहाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यामुळे जनतेने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे, असे आवाहन कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री ईश्वर खंड्रे यांनी केले.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ आयोजित ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक सभेत ते बोलत होते. मंचावर लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख ,काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके, माजी खासदार सुधाकर शृंगारे, राष्ट्रवादीचे नेते संभाजी पाटील ,तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती अजित माने, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश रेशमे ,माजी सरपंच मोहनराव भंडारे, निलंगा महिला तालुका अध्यक्ष सौ आरती भंडारे , अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष लाला पटेल , पंकज शेळके, बाबुराव भंडारे , हाजी सराफ, दत्ता सोमवंशी , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे , वलांडीचे माजी सरपंच राम भंडारे , पद्मंिसह पाटील हे उपस्थित होते.
मंत्री ईश्वर खंड्रे म्हणाले की, मराठवाड्यात जो सर्वांगीण विकास झाला आहे. तो स्व विलासराव देशमुख व स्व. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला असून त्याचे सर्व श्रेय काँग्रेसला जाते . मतदारांचा उत्साह व जोश पाहता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. व निलंग्यात काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके विजयी होणार आहेत .म्हणून तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR