24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या जागा वाटपाविषयी भाजप नेत्यांमध्ये जोरबैठका

महायुतीच्या जागा वाटपाविषयी भाजप नेत्यांमध्ये जोरबैठका

मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने उरले आहेत. कधीही या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांचे नेते कामाला लागले आहेत. जागा वाटप हाच या दोन्ही आघाड्यांमधील महत्त्वाचा तिढा आहे. तो सोडवण्यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये जोरबैठका होत आहेत.

तसेच पक्षीय स्तरावरही स्वतंत्र बैठका घेऊन जागा वाटपाची तसेच इतर राजकीय रणनीतीही ठरवली जात आहे. भाजपमध्येही सध्या जोरबैठका वाढल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज मुंबईत आले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालीच भाजपची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि खासदार पीयूष गोयलही या बैठकीला उपस्थित आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

महायुतीच्या जागा वाटपाबाबतच्या चर्चा झाल्या होत्या. त्यावेळी शिंदे आणि अजितदादा गटांनी किती जागा लढवायच्या याबाबतची माहिती भाजपला दिली होती, असं सांगितलं जातं. त्यावरच आजच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय कोणत्या जागांचा अधिक तिढा आहे तसेच कोणत्या जागांची अदलाबदली करायची आहे, यावरही चर्चा केली जाणार आहे. तसेच मुंबई, पुणे आणि नागपूरमधील काही महत्त्वांच्या जागांबाबतही यावेळी चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR