30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन्ही पूल पाण्याखाली

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन्ही पूल पाण्याखाली

निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शाहजानीसह परिसरातील गावात गत तीन दिवसांपासून संततधार पावसाची जोरदार हजेरी आहे. यामुळे परिसरातील नदी, नाले, तुंडूब झाले असून दरम्यान मांजरा-तेरणा नदीच्या संगमावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन्ही पुल पाण्याखाली गेले आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात शनिवारी दुपारपासून संततधार पाऊस सुरु आहे. गेले तीन दिवस झालेल्या पावसामुळे या भागातून वाहणा-या मांजरा व तेरणा नद्या भरुन वाहत आहे. बंधा-याची दारे उघडून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात नदीपात्रात सोडल्याने संगमावर पुरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. यातच औराद-वाजंरखेडा व औराद-तुगाव पुल पाण्याखाली गेले आहेत नदी पलिकडील गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी शेतक-यांच्या जमिनीत घुसल्याने संगमाजवळील शेतकरी शिवपुत्र आग्रे, ंिदगबर माने, रामदास खरटमोल, नाईकवाडे या शेतक-यांची सोळा जनावरे शेतात अडकली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी मोतीराम भुई, रामंिसग भुई, गंगाराम भुई यासह परिसरातील शेतक-यांनी पाण्याच्या प्रवाहात ट्युबच्या सहायाने जाऊन बाहेर काढले. दरम्यान, औराद शहाजानी येथे संततधार पावसामुळे काही जुन्या घरांची पडझड झाली आहे. यात बलभीम कोंडिबा सुर्यवंशी यांची घराची भिंत पडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR