लातूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीने (मविआ) महिला, युवक, शेतकरी आणि कामगारांच्या विकासासाठी पंचसुत्री जाहीर केली आहे. यात महिलांना दरमहा तीन हजार रुपयांचे मानधन देण्याबरोबरच त्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. शेतकरी, युवक आणि कामगारांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे ‘मविआ’ची पंचसुत्री ही सर्वांच्या कल्याणाची असल्यामुळे मतदारांनी ‘मविआ’चे लातूर ग्रामीणचे उमेदवार धिरज देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ रेणापूर तालूक्यातील मोहगाव, तळणी, धवेली येथे दि. ७ नोव्हेंबर रोजी महिला संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या संस्थापीका सौ. दीपशीखा धिरज देशमुख, इंदुताई इंगे, पुजाताई इंगे, निर्मलाताई गायकवाड, शिवकन्याताई पिंपळे, जयश्रीताई राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. या निधीतून विविध विकास कामे झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ विकासाचे एक मॉडेल बनविण्याचे धिरज देशमुख यांचे प्रयत्न आहेत. तुमच्या आशिर्वादामुळे मतदारसंघाचा विकास होतो आहे. यात आणखी मोठी भर टाकण्याकरीता आपल्या आशिर्वादाची पुन्हा आवश्यकता आहे. आपण आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन केले.
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दुरदृष्टीतून निर्माण झालेल्या मांजरा परिवारामुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले. मुलांचे शिक्षण, मुला, मुलींचे लग्न, चांगले आरोग्य राखण्यासाठी केली जाणारी तजवीज करण्याची आर्थिक क्षमता मांजरा परिवारामुळेच शेतक-यांमध्ये निर्माण झाली. शिवाय लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिलांना मिळणा-या विविध योजनांचा लाभ आयुष्य समृद्ध करणारा ठरला आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या विचारांचा आणि कार्याच्या वारसा घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार आमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्यासह आम्ही सर्वजन आपल्या सेवेते तत्पर आहोत. त्यामुळे भाजपा महायुतीच्या भूुलथापांना बळी न पडता आमदार धिरज देशमुख यांना मतदानरुपी आशिर्वाद द्यावा, असेही श्रीमती वैशालीताई देशमुख
म्हणाल्या.
याप्रसंगी रीड लातूरच्या संस्थापीका सौ. दीपशीखा देशमुख म्हणाल्या, आमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत विकासाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात विकासाच्या कामांना गती मिळाली. असंख्य कामे झाली आहेत. त्यामुळेच या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी आमदार धिरज देशमुख यांना मतदारांनी पुन्हा एकदा आशिर्वाद द्यावेत. यावेळी अनिता पवार, सीमा पाटील, मनिषा हारडे, जिजाबाई शिंदे, प्रावती माने, जनाबाई माने, दौंडाबाई माने, इंदुबाई माने, राधा माने, सुदामती कांबळे, संगिता भिसे, मिरा खडके, कांताबाई माने, लताबाई शिंदे, लक्ष्मीबाई वाघमारे, गयाबाई गाडे, वंदना वाघमारे, रुक्मिण शिंदे, अनुसया माने, शबनूर निचलकर, असलम निचलकर, मुस्कान निचलकर, संगिता काळे, स्वाती वल्मपल्ले, अरुणा पाटील, संगिता गोकळे, चंद्रकला गोकळे, शांताबाई काळे, कल्पना वल्मपल्ले, विमल कोतले, सुमन गुंडरे, शोभाबाई गोकळे, शोभा मोमले, शांताबाई महामणी, ललीता यशवंत, शोभावती लोहारे, वैशाली कणसे, मिराबाई मोमले, ज्याती यशवंत, रंजना कणसे, शांताबाई सुर्यवंशी, शिंदुबाई यशवंत, संगिता बनसोडे, कांताबाई काळे, विजया काळे, महानंदा कनसे, गयाबाई झुल्पे, गवळणबाई शिंदे, सखुबाई केचे, पुजाताई पवार, बनिता मुके, शामाबाई शिंदे,
ललीता सुर्यवंशी, पुजा रावूतराव, मनिषा शिंदे, गवळण शिंदे, सुनिता मेकले, शांता करकुले, लक्ष्मी पवार, इंद्राईणी शिंदे, सुनिता मेकले, प्रार्वती शिंदे, मुकरबाई सुर्यवंशी यासह आदी महिला व कॉग्रेस पक्षाचे कार्यकते व गावकरी मंडळींची उपस्थिती होती.