पुणे : प्रतिनिधी
महाविकास आघाडीत महाबिघाडी होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या, अशी टीका करत कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले.