लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची संत गोरोबा मागासवर्गीय सहकारी भाडेकरु मालकी गृहनिर्माण संस्था लातूरच्या शिष्टमंडळाने दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन लातूर शहर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला.
संत गोरोबा मागासवर्गीय सहकारी भाडेकरु मालकी गृहनिर्माण संस्था लातूरचे अध्यक्ष सतीषराव बाबुराव कांबळे, सचिव देविदास भागुरामराव गायकवाड, प्रकाश सूर्यवंशी, सूर्यभान पुरी, सचिन शिंदे, काशिनाथ हिरा वाघमारे, अश्विनी संदीप गायकवाड, राजू जीवन गायकवाड, प्रकाश सोनबा पाडोळे, लिंबराज धोंडीबा मगर, मंगलबाई भाऊसाहेब गायकवाड, कोंडाबाई गुलराज पवार, अर्जुन देडे, विशाल कांबळे आदि उपस्थित होते.