17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेने अष्टविनायक पोलीस चौकी पुन्हा सुरु

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेने अष्टविनायक पोलीस चौकी पुन्हा सुरु

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी   दि. ९ जानेवारी रोजी सकाळी लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्याशी फोनवरुन संवाद साधून ट्युशन एरियातील बंद असलेली अष्टविनायक मंदिराशेजारील पोलीस चौकी सुरु करण्याबाबत सूचना केली होती. त्यानूसार ही पोलीस चौकी पुन्हा सुरु झाली आहे.
अत्यंत रहदारीचा परिसर असलेल्या ट्युशन एरियात हाणामारी, टवाळखोरांचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी पोलीस चौकी पुन्हा सुरु करावी, चार्लिची ग्रस्त वाढवावी, दामिनी पथक रात्री अपरात्री कायम ठेवावे, ट्युशन एरिया परिसरात ड्युटीवर  असलेल्या पोलीस कर्मचा-यांचा मोबाईल नंबर सर्व ट्युशन चालकांना देण्यात यावा, अष्टविनायक  पोलीस चौकीला पुरुष व  महिला कर्मचारी कायमस्वरुपी नेमावेत, अशी त्यांनी सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांना केल्या होत्या.
या संदर्भाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांची काँग्रेस  पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट घेवून ट्युशन एरियातील अनेक प्रश्नासंदर्भात चर्चा केली, सर्व सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली होती.  यावेळी माजी महापौर प्रा.  डॉ. स्मिता खानापुरे, माजी नगरसेवक राजकुमार जाधव, राजु मोटेगावकर, धर्मराज जांभळे, महेश नागलगावे, सुवर्णा खानापुरे, शीतल जायगावकर आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR