लातूर : प्रतिनिधी
ट्वेन्टीवन अॅग्री लि., आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड क्षेत्रामध्ये काम करीत आहे. या सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव येथे सेंद्रीय ऊस लागवड शुभारंभ करण्यात आला.
ट्वेन्टीवन अॅग्री लि., आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून सेंद्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना ट्वेंटीवन अॅग्री ली.,च्या माध्यमातून संस्थेच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख राबवीत आहेत. या भागात सेंद्रीय ऊसशेतीला चालना देण्यासाठी सेंद्रीय ऊसलागवडचा शुभारंभ करण्यात आला आहे. येणा-या काळात सेंद्रीय ऊसशेती लागवड व दर्जेदार उत्पादनासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या अनुषंगाने बाभळगाव येथील शेतीत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सेंद्रीय ऊस लागवड शुभारंभ करण्यात आला.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले, दिवसे दिवस सेंद्रीय शेती आरोग्य आणि पर्यावरण संर्वधनासाठी काळाची गरज बनली आहे. यामुळे जगाची वाटचाल सेंद्रिय शेतीकडे सुरु आहे. ही काळाची पाऊल ओळखून ट्वेंटीवन अॅग्रीच्या माध्यमातून ऊस, ज्वारी, गहू सर्व प्रकारच्या डाळी, अश्वगंधा, तुळस, औषधी वनस्पती, फळे व पालेभाज्यासह इतर सेंद्रिय पीक उत्पादनास चालना देण्यात येत आहे. यासोबत ट्वेंटीवन अॅग्रीकडून ऊसउत्पादकांना सेंद्रिय ऊस लागवड करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सेंद्रीय ऊसाची लागवड वाढवून रसायनमुक्त्त साखर निर्मीती वाढली तर या साखरेला चांगली मागणी आणि भाव मिळणार आहे. यामुळे शेतक-यांनादेखील चांगला ऊस्दर मिळेल. नागरिकांना रसायनमुक्त्त साखर देणे शक्य होणार आहे असे यावेळी त्यांनी सांगीतले. याप्रसंगी ट्वेन्टीवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, गोविंद देशमुख, अंकुर हायटेक नर्सरीचे संचालक धनंजय राऊत, तानाजी मस्के व ट्वेंटीवन अॅग्रीचे सर्व सहकारी उपस्थित होते.