लातूर : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील शिरोळ (वा) येथे भाजपला मोठे खिंडार पडले असून येथील लोकनियुक्त सरपंच राजेश सुर्यवंशी यांच्यासह शेकडो भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजीमंत्री दिलीपराव देशमुख व खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या उपस्थितीत कॉग्रेस मध्ये आशियाना निवासस्थानी प्रवेश केला. या सर्वांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांनी सत्कार केला.
यावेळी माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, कॉग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरंिवद भातांब्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, अॅड.नारायणराव सोमवंशी, चक्रधर शेळके, महेश देशमुख, शकील पटेल अदी उपस्थित होते. शिरोळ येथील लोकनियुक्त सरपंच राजेश सुर्यवंशी हे यशस्वी उद्योजक असून त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने त्यांच्या प्रवेशामुळे निटूर जिल्हा परिषद गटामध्ये कॉग्रेस पक्षाची ताकद वाढनार असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल असे चित्र निलंगा विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.
याप्रसंगी राजेश सुर्यवंशी यांच्यासोबत भाजपमधून काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्यात शंकराप्पा डिग्रे, माजी सरपंच गुंडू कदम, नागोराव वाघमारे, सिध्देश्वर कांबळे, अमोल कदम, लक्ष्मण पुरे, अल्लाउद्दीन तांबोळी, शंकर क्षिरसागर, ंिलबराज जाधव, शिवाजी शिंदे, रामकृष्ण गोजरटे, सुरेश गिरी, प्रदीप धडे, मंिच्छद्र क्षिरसागर, गंगाधर क्षिरसागर, शिवाजी मोरे, सुमित मोरे, व्यंकट कदम, झटींग कदम, दयानंद जाधव, बब्रुवान क्षिरसागर, मारोती कदम, बब्रुवान गवारे, शशिकांत कदम, उत्तम जाधव, अहमद मुल्ला, मन्मथ कुज्जेवाड, अभिषेक जाधव, मुन्ना कदम, महेश कदम, सोमनाथ सुरवसे, भागवत सूर्यवंशी, मारोती कदम, कैलास कदम, ज्ञानेश्वर गोजरटे, शाहूराज सूर्यवंशी, भगवान कदम, हरीशचंद्र कदम, चंद्रकांत कदम, अजय कदम, अतुल कदम, मारोती सुरवसे, सुधाकर सुरवसे यांचा समावेश आहे.