19.1 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeलातूरमाळुंब्रा उपकेंद्राच्या कार्यारंभाचे आदेश निर्गमित

माळुंब्रा उपकेंद्राच्या कार्यारंभाचे आदेश निर्गमित

औसा : प्रतिनिधी

औसा मतदारसंघातील शेतक-यांना उच्च दाबाने व अखंडित विद्युत पुरवठा करण्याबरोबरच रोहित्र वेळेवर दुरुस्त करून देणे, विद्युत उपकेंद्रांची क्षमता वाढ करण्याचे काम तातडीने पूर्ण करणे, मंजूर नवीन उपकेंद्राचे काम तातडीने सुरु करणे आणि फिडर सेपरेशनची कामे प्राधान्याने पूर्ण करणे इत्यादी विषयांवर आमदार अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधीद्वारे नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. तसेच माळुंब्रा उपकेंद्राच्या कार्यारभांचे आदेश निर्गमित केले आहेत.

आमदार अभिमन्यू पवारांच्या मागणीमुळे १७ नोव्हेंबर, २०२२ रोजी पाठपुराव्याअंती माळुंब्रा येथे ३३/११ केव्हाही क्षमतेचे स्वतंत्र विद्युत उपकेंद्र मंजूर झाले होते. यासाठी जागा निश्चीत करणे, भूसंपादन करणे व निविदा प्रक्रिया राबविणे इत्यादी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून आणि ८ डिसेंबर, २०२३ रोजी कार्यरंभ आदेश निर्गमित करून माळुंब्रा उपकेंद्राच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. आरडीएसएस अंतर्गत मंजूर आशिव, उजनी, ंिलबाळा, याकतपूर, सयाखानचिंचोली, रामंिलंग मुदगड आणि बोरफळ या ७ नवीन उपकेंद्रासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील २-३ महन्यिांमध्ये कार्यारंभ आदेश निर्गमित करून कामे प्रत्यक्षात सुरु करण्यात येतील. औसा एमआयडीसी येथील ५ एमव्ही क्षमतेच्या रोहित्रचे काम प्रगतीपथावर असल्याचे आमदार अभिमन्यू पवारांनी सांगितले.कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० धोरणाअंतर्गत जिल्हास्तरावर उपलब्ध असलेल्या कृषी आकस्मिकता निधीमधून एकूण २४६ उपकेंद्राच्या कामांकरीता मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी १६१ उपकेंद्राच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले असून, सदर कामे कृषी आकस्मिकता निधीच्या उपलब्धतेनुसार हाती घेण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR