मुंबई: लोकसभा २०२४ निवडणूकीची मतमोजणी सुरु झाली असून मुंबईतील कल हाती येऊ लागले आहे. मुंबईत लोकसभेच्या एकुण ६ जागा आहेत. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल विरुद्ध भूषण पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, वायव्य मुंबईत रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई, उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा यांच्यात लढत होत आहे.
दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार
मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना पिछाडीवर टाकलं आहे. दक्षिण मुंबईत ठाकरेंचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर सध्या आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदेंचे उमेदवार यामिनी जाधव, राहुल शेवाळे आणि रवींद्र वायकर सध्या पिछाडीवर आहे. त्यामुळे सध्यातरी मुंबईत ठाकरेंचाच आवाज असल्याचं दिसून येत आहे.