22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे कार्यालय फोडले

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे कार्यालय फोडले

पोलिसांकडून लाठीचार्ज

मुंबई : मुंबईत काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतील किल्ला कोर्टच्या समोर असलेल्या काँग्रेस कार्यालयाची भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडलाय. मुंबईत भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले त्यानंतर पोलिसांनाही मारहाण केली आहे.

भाजप युवा मोर्चाकडून मुंबईत किल्ला कोर्टाच्या समोर काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाजप कार्यकर्ता आक्रमक होत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. सोबत राहुल गांधी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या पोस्टरवर काळी शाही फेकली. भाजप कार्यकर्ता राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या सन्मानात भाजपा मैदानात अशा पद्धतीचे पोस्टर घेऊन हा आंदोलन केले. भाजप आंदोलकांवर यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतला. दरम्यान, लोकशाही पद्धतीने आंदोलन नसून पोलिसांचा आडून भाजपकडून हा हल्ला करण्यात आला आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसने नेहमी संविधानाचा अपमान केला आहे. काँग्रेसने आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी प्रयत्न केले होते, असे म्हणत भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले आणि त्यानंतर तोडफोड देखील करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन पांगवण्याच प्रयत्न केला आहे.

काँग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी देशभरात निषेध आंदोलन सुरु केले आहे. यालाच उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर जात घोषणाबाजी केली आहे. शिवाय शाईफेक देखील करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगवल्यानंतर काँग्रेस कार्यालय उघडून पोलिस आतमध्ये किती नुकसान झाले याच्या पाहणीसाठी आले होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR