21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबादेवीचा आशीर्वाद ठाकरेंनाच

मुंबादेवीचा आशीर्वाद ठाकरेंनाच

दक्षिण मुंबईचा गड अरविंद सावंतांनी राखला यामिनी जाधवांचा दारुण पराभव!

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीची गणितं ज्या मतदारसंघावर अवलंबून आहेत, ज्या मतदारसंघावर अवलंबून आहे, तो दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरेंना स्वत:कडे राखण्यात यश मिळाले आहे. दक्षिण मुंबईतून ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. विद्यमान आमदार यामिनी जाधव यांचा सावंतांनी दारुण पराभव केला आहे.
देशाची आर्थिक राजधानी म्हणजे, मुंबई या आर्थिक राजधानीतील संपूर्ण आर्थिक उलाढालींचे गणित दक्षिण मुंबईवर अवलंबून आहे. पूर्वीची मूळ मुंबई म्हणजेच, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ कष्टकरी कामगारांच्या गिरणगावासह अगदी उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या मलबार हिलपर्यंत सर्व वर्गातील लोकांना सामावून घेतो. याच मतदारसंघात दोन कडवट शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली.

यंदाच्या लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उतरवण्यात आले २०१४ आणि २०१९ सलग दोनदा अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील मतदारांनी संसदेत पाठवले. यंदाची निवडणूक आजवरच्या इतिहासात तशी वेगळी ठरली.

यंदा शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे संपूर्ण लोकसभा निवडणूक खरी ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशातच अरविंद सावंतांसमोर तगडा उमेदवार देण्यासाठी महायुतीत मोठा खल झाला. अखेर दक्षिण मुंबईतील लढत झाली ती, दोन कडवट शिवसैनिकांमध्ये… अरविंद सावंतांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR