27.7 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटी माहिती पसरवताहेत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटी माहिती पसरवताहेत

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

कर्नाटक सरकारने मिरवणूक रोखत गणेश मूर्ती ताब्यात घेतल्याचा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. यावर आता नाना पटोलेंनी दोन्ही नेत्यांवर पलटवार केला. कर्नाटकातील मांड्या येथे गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी हिंसा घडली. या प्रकरणात पोलिसांनी ५२ लोकांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकारण तापलेले असताना सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात गणेश मूर्ती पोलिस घेऊन जातात आणि गाडीत ठेवतात.

हे फोटो पोस्ट करत काही जणांनी कर्नाटक सरकारने गणपती मिरवणूक रोखली आणि गणेश मूर्ती जप्त केली, अशा आशयाच्या पोस्ट लिहिल्या आहेत. फोटोमध्ये पोलिस गणेश मूर्ती पोलिसांच्या वाहनात ठेवताना दिसत आहेत. हेच फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केले आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता.
त्याला प्रत्युत्तर देत पटोले म्हणाले, भाजप आणि महायुती फेक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अगोदर राहुलजी गांधी यांच्याबद्दल स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलन करत होते.

आता कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती देऊन फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यातील सुज्ञ जनता यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. जनतेला यांचा खरा चेहरा माहीत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याचबरोबर फॅक्ट चेक बातमीचा हवालाही दिला.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकातील एका घटनेबद्दल खोटी माहिती पसरवून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
एका वृत्तवाहिनीने याबद्दल ‘फॅक्ट चेक’ केले आहे.

त्यातून ही माहिती समोर आली की, व्हायरल होत असलेले फोटो एका आंदोलनावेळचे आहेत. लोक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करायला आलेले होते. पोलिसांनी लोकांना ताब्यात घेतले आणि आंदोलकांकडील गणेश मूर्ती पोलिसांच्या गाडीत ठेवली. आंदोलकांना मोठ्या व्हॅनमध्ये बसवण्यात आले, तर त्यांच्याकडील मूर्ती स्वत:च्या गाडीत ठेवली होती. त्यामुळे गणपती मिरवणूक रोखली आणि मूर्ती जप्त केल्याच्या पोस्ट खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR