23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeउद्योगमॉरिशस, यूएईनंतर मालदिवमध्येही रुपे कार्ड!

मॉरिशस, यूएईनंतर मालदिवमध्येही रुपे कार्ड!

डिजिटल इंडियाचा जगभरात डंका एनपीसीआयची माहिती, चलनाला चालना मिळणार

नवी दिल्ली : भारताचे रुपे कार्ड लवकरच मालदीवमध्ये लाँच होणार आहे. यामुळे मालदीवच्या चलनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हे पाऊल अशा वेळी उचलले जात आहे, जेव्हा मालदीव आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध थोडे खराब झाले आहेत.

मालदिवच्या चलनाला चालना मिळणार असून रुपे कार्ड आता मालदिवमध्ये सुरू होणार आहे. याची माहिती एनपीसीआयने दिली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे रुपे हे भारतातील जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्कमध्ये समाविष्ट केलेले पहिले कार्ड आहे. हे भारतात एटीएम, वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सवर पेमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाते.

आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी भारताची रुपे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीन द्विपक्षीय व्यापारात स्थानिक चलन वापरण्यास सहमत आहेत. भारताची रुपे सेवा सुरू केल्याने मालदिवियन रुफियाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

डॉलरच्या समस्येवर तोडगा काढणे आणि स्थानिक चलन बळकट करणे हे सध्याच्या सरकारसाठी
सर्वोच्च प्राधान्य आहे असे मोहम्मद सईद यांनी सांगितले. दरम्यान भारताची एनपीसीआयमध्ये सहभागी होणा-या सदस्यांना ऑनलाइन व्यवहार रूटिंग, प्रक्रिया आणि सेटलमेंट सेवा पुरवते . एनपीसीआय थेट किंवा तृतीय पक्षाद्वारे, यूपीआय सहभागींचे ऑडिट करू शकते आणि वढक मधील त्यांच्या सहभागासंदर्भात डेटा, माहिती आणि रेकॉर्ड मागवू शकते.

दरम्यान भारत आणि चार देशांच्या युरोपियन गटाने वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीत परस्पर व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचे सदस्य आइसलँड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे देश आहेत. या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ७ मार्च रोजी मंजुरी मिळाली होती. मुक्त व्यापाराला चालना देण्यासाठी आणि गती देण्यासाठी ही एक आंतर सरकारी संस्था आहे. त्यातच देशाच्या वाढत्या डिजिटल व्यवहारामुळे उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

रुपयाच्या व्यवहारासाठी वापरले जाणार कार्ड
रुपे सेवा सुरू करण्याची कोणतीही तारीख त्यांनी जाहीर केली नाही. कॉर्पोरेट मालदिव.कॉम या न्यूज पोर्टलने गेल्या आठवड्यात मोहम्मद सईद यांचा हवाला देत हे कार्ड मालदीवमध्ये रुपयाच्या व्यवहारासाठी वापरले जाईल असे म्हटले होते. तसेच, आम्ही सध्या रुपयांमध्ये पेमेंट सुलभ करण्याचे मार्ग शोधण्यासाठी भारताशी चर्चा करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

६ देशांमध्ये सुरु झाली सेवा
भारत सरकारने यूपीआय मजबूत करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. रुपे कार्ड सेवा जगातील अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये आतापर्यंत सात देशांचा समावेश आहे, ज्यामध्ये फ्रान्स, सिंगापूर, मॉरिशस, श्रीलंका, भूतान आणि यूएई यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR