28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमोटारसायकल व मोबाईल चोरणा-या टोळीस अटक

मोटारसायकल व मोबाईल चोरणा-या टोळीस अटक

लातूर : प्रतिनिधी

शहरातील वाढती दुचाकी, मोबाईल चोरी लक्षात घेवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात कारवाई करुन अशा चो-या करणा-या सहा जणांना २१ मोबाईल, ११ दुचाकी व १ लॅपटॉपसह अटक करून पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथके तयार करण्यात आले. पथकांना गुप्त बातमीदाराकडून मोटार सायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे करणा-या आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार मोटर सायकल व मोबाईल चोरी करून ते मोबाईल कमी किमतीत लोकांना विकणा-या अक्षय प्रभाकर कणसे,वय २८ वर्ष, राहणार वाल्मिकी नगर,गल्ली नंबर ३, लातूर, समाधान बाळासाहेब जाधव, वय २० वर्ष, राहणार काडगाव, तालुका जिल्हा लातूर. सध्या राहणार एस एस लॉजच्या बाजूस, एक नंबर चौक, लातूर, सद्दाम हुसेन शेख,वय २४ वर्ष, राहणार पळसप, तालुका जिल्हा धाराशिव. सध्या राहणार माऊली नगर पाखरसांगवी, लातूर, राम उर्फ लखन सुधाकर संदीले, वय २४ वर्ष राहणार, सरस्वती शाळेच्या पाठीमागे, प्रकाश नगर, लातूर. महेश नामदेव नरहरे, वय २१ वर्ष, राहणार महाळंग्रा तालुका चाकूर, जिल्हा लातूर.

सध्या राहणार सोना नगर, लातूर, आशिष गोविंद पवार, वय २४ वर्ष, राहणार माळुंब्रा, तालुका औसा जिल्हा लातूर सध्या राहणार सोना नगर, लातूर, यांना दि. ३० जानेवारी रोजी त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखीन तीन साथीदारासह लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. आरोपीनी विविध गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल १ लॅपटॉप, २१ मोबाईल व ११ मोटारसायकली असा एकूण ८ लाख ३२ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR