22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमोदींना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का नाही?

मोदींना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का नाही?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या ध्यानधारणेचे लाईव्ह टेलिकास्ट करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर टीका केली आहे. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मोदींना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का देण्यात आले नाही?, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून हा खोचक टोला लगावला आहे. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही? काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते स्वत:ला कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे आले. काल त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसमोर त्यांनी ही साधना सुरू केली आहे. ४५ तास त्यांची ध्यानधारणा असणार आहे. तर ३५ तास ते मौनव्रतही करणार आहेत. या काळात मोदी अन्न घेणार नाहीत. फक्त नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस घेणार आहेत. त्यांची ही साधना १ जूनच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. मोदी ज्या ठिकाणी ध्यानधारणा करत आहेत, तिथेच १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR