18.1 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूररब्बी हंगामासाठी बँकांकडून शेतक-यांना ६०० कोटींचे पीक कर्ज वाटप होणार

रब्बी हंगामासाठी बँकांकडून शेतक-यांना ६०० कोटींचे पीक कर्ज वाटप होणार

लातूर : प्रतिनिधी
या वर्षी जिल्हयात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही चांगली येणार आहेत. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांना लागणारे खत, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी व पुढील पिकांच्या वाढीसाठी जिल्हयातील २२ बँकांच्याकडून जिल्हयातील शेतक-यांना ५९९ कोटी ९८ लाख ७२ हजार रूपयांच पीक कर्ज वाटप करण्यात येणार  आहे.
जिल्हयात यावर्षी खरीपाच्या हंगामानंतर रब्बीच्या पेरण्यासाठी शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. कृषि विभागाने जिल्हयात ३ लाख ८२ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. यात यात ज्वारीचा ७१ हजार ४ हेक्टरवर, मका २ हजार ६३ हेक्टर, गहू १० हजार ५३२ हेक्टर, हरभरा २ लाख ७६ हजार ९५२ हेक्टर, करडई २१ हजार ७२० हेक्टर, सुर्यफूल ८६ हेक्टर, जवस १८० हेक्टर, तीळ २ हेक्टर, भुईमूग, लहान कारळे आदी पिकांचा पेरा होणार असल्याचे कृषि विभागाकडून सांगण्यात आले
आहे.
रब्बी हंगामात शेतक-यांनी सावकाराकडे हात पसरू नयेत म्हणून शासनाने बँकांना ५९९ कोटी ९८ लाख ७२ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटपाचे लक्षांक दिले आहे. सदर पीक कर्ज वाटप प्रक्रीया दि. १ नोव्हेंबर  पासून सुरू होणार आहे.  या रब्बी हंगामात शेतक-यांना मागणीनुसार कर्ज पुरवठा करण्याच्या सुचना आहेत. जिल्हयातील शेतक-यांना बँका पीक कर्ज वाटप पिक निहाय मागणी नुसार करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR