24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूररमाई आवास योजनेअंतर्गत २९२ नवीन घरकुलांना मंजुरी 

रमाई आवास योजनेअंतर्गत २९२ नवीन घरकुलांना मंजुरी 

लातूर : प्रतिनिधी 
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने रमाई आवास (घरकुल) योजनेअंतर्गत विद्यमान वर्षात नव्याने २९२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या घरकुलांना मंजुरी देण्यात आली. समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त्त समाज कल्याण शिवकांत चिकुर्ते यांच्यासह प्रादेशिक उपायुक्त्त समाज कल्याण अविनाश देवसटवार, मनपाचे अतिरिक्त्त आयुक्त्त शिवाजी गवळी, शहर अभियंता नवनाथ केंद्रे, सहाय्यक संचालक नगर रचना निकीता भांगे यांचा या समितीत समावेश आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी लातूर मनपामार्फत रमाई घरकुल योजना राबविण्यात येते. या प्रवर्गातील ज्या व्यक्त्तींकडे घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा व्यक्त्तींंना या योजनेचा लाभ देण्यात येतो.घर बांधण्यासाठी त्या व्यक्त्तीस अडीच लक्ष  रुपयांचे अनुदान देण्यात येते. लाभधारकाने घरकुलाचे बांधकाम स्वत: करावयाचे असून टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित केले जाते. यासाठी लाभधारकाने शौचालयासह ३० चौरस मीटरचे बांधकाम करणे बंधनकारक आहे.
या योजनेत अंतर्गत लातूर मनपा क्षेत्रात सन २०१२ पासून फेब्रुवारी २०२४ पर्यंत एकूण ४ हजार १९५ घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी ३ हजार ५३७  घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. आता नव्याने २९२  घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. लाभधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ज्यांना घरकुल मंजूर झाले आहे. त्यांनी लवकरात लवकर बांधकाम सुरु करावे, असे आवाहन मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR