25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयराज्यसभेत बहुमत भाजपसाठी मृगजळ; आणखी दोन वर्ष लागणार!

राज्यसभेत बहुमत भाजपसाठी मृगजळ; आणखी दोन वर्ष लागणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले आहे. पण, राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हे भाजपसाठी मृगजळ ठरत आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील म्हणजे, २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल.

सध्या राज्यसभेत भाजपचे ९६ सदस्य आहेत. जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीनंतर पक्षाची सदस्यसंख्या दोनने वाढू शकते. कारण, जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेचे ४ खासदार निवडून येतील. या सभागृहातील सदस्य संख्या वाढविण्यासाठी भाजपला २०२४-२६ या काळातील महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, बिहार आणि दिल्ली या राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकाव्या लागतील.

तामिळनाडूत २०२५ मध्ये सहा जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक होणार आहे. मात्र, या राज्यात भाजपला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. आंध्रप्रदेशातील पोटनिवडणुकीनंतर भाजपचा आकडा एकने वाढू शकतो. सध्या राज्यसभेत २४५ पैकी २३७ सदस्य आहेत.

सध्या भाजपची स्थिती काय?
– २०२६ मध्ये राज्यसभेच्या ७२ जागांसाठी निवडणुका होतील तेव्हा भाजपचे संख्याबळ वाढू शकेल. बहुसंख्य राज्यांत भाजप सत्तेत आहे.
– पण, स्वबळावर १२२ जागांसह बहुमत मिळवायचे असेल तर भाजपला सर्व राज्यातील निवडणुका जिंकाव्या लागतील.
– एनडीए सत्तेत असलेल्या राज्यात छोट्या आणि प्रादेशिक पक्षाच्या खासदारांना त्या पक्षापासून फोडून नंतर पोटनिवडणुकीत त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्यात पक्षाला यश आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR