परभणी : महाराष्ट्र राज्य सेपक टाकरा असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन यांच्या वतीने ३४ वी महाराष्ट्र राज्य सिनियर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ठाणे येथे दि. ९ ते ११ ऑगस्ट कालावधीत संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी परभणी जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन परभणी यांच्यावतीने दि.४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता निवड चाचणी डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीस सिनियर वयोगटातील पुरुष व महिला जिल्ह्यातील नोंदणीकृत खेळाडू सहभाग नोंदवू शकतात. या निवड चाचणीत निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र राज्य सेपक टाकरा असोसिएशन आणि ठाणे जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत घेतल्या जाणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतील.
या निवड चाचणीत येताना खेळाडूंनी चार पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड झेरॉक्स, जन्म दाखल्याचा झेरॉक्स , बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच निवड चाचणी न्ीोंदणी शुल्क २०० रूपये सोबत घेऊन यावे. या निवड चाचणीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. महमद इकबाल, सचिव गणेश माळवे यांनी केले आहे.