15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeलातूरराज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार दिवाळखोरीत

राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार दिवाळखोरीत

लातूर : प्रतिनिधी
दहा वर्ष हवेत असणारे सरकार ४०० पारचा नारा देत होत.े पण इंडिया आघाडींने त्यांना २४५ वर  रोखले आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आह. देशाच्या एकूण टॅक्स  पैकी ८० टक्के टॅक्स मुंबईहून जात. ४० टक्के महाराष्ट्रातून उत्पन्न दिल्ली सरकारला मिळतो. लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री  असताना अनेक  उद्योगपती महाराष्ट्रात अनेक उद्योग निर्माण करण्यासाठी उत्सुक होते. मात्र या महायुतीच्या काळात येणारे उद्योग महायुती सरकारने गुजरातकडे वळवले आहे. राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार दिवाळखोरीत असुन राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांस मतदान करुण  राहुल गांधी, शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा. शाहू ,फुले, आंबेडकर  छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा विचार जोपासण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांना निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गाधवड जिल्हा परिषद  सर्कलमधील काँगेस पदाधिका-यांची बैठक लातूर शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालयात दि. १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासरावजी देशमुख,राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, मदन भिसे, इंदिरा सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, पृथ्वीराज शिरसाठ ,राजकुमार पाटील, अँड प्रवीण पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके,मांजरा साखर कारखान्याचे संचालक बाबुराव जाधव, बंकटराव कदम, रघुनाथ शिंदे संभाजीराव सुळ, पुंडलिक माने रणजित पाटील शाहुराव पवार ज्ञानेश्वर भिसे, रामदास पवार हरिराम कुलकर्णी शिवाजी कांबळे चांदपाशा इनामदार बालाजी पाटील धनंजय बावणे अभिमान भोले, अमोल भिसे संभाजी कदम, महेश अन्नदाते, मादळे, माणिक पुजारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख उपस्थित होते.
मागच्या निवडणुकीतील अधिक मताधिक्य द्या
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख  निवडून तर येणारच आहेत पण किती मताधिक्य देणार ते मताधिक्य यापूर्वीचे रेकॉर्ड मोडणारे असावे, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. गावागावात विरोधक आहेत. विरोधकांनाही आपल्या घरी चहा पिण्यासाठी बोलवा, असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना दिला. शेतीमालाचे भाव दहा वर्षे वाढत नाहीत शेतक-यांना स्वाभिमान योजना राबवली जाते. प्रतिदिन १७ रुपये ३३ पैसे हे सरकार देते आहे. १७ रुपये ३३ पैसे नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या. आफ्रिकेतून येणारे सोयाबीन बंद करा आणि लातूरचे सोयाबीन खरेदी करा, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सेवेच्या माध्यमातून बँक चालवली जाते पण ती दिवाळी खोरीत  निघणार नाही याची आम्ही काळजी घेतो. मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने एफ. आर. पी. पेक्षा आधिक भाव देवुन शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम आम्ही केले पुढेही करणार असून यासाठी लातूर शहर मतदार संघातून अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे त्यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील महायुती महाराष्ट्र सरकार दिवाळखोरीत असल्याचे सांगून  आम्ही सत्तेत असताना दोन वेळा अर्थसंकल्प मांडला सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून पुन्हा एकदा महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे
बूथ प्लस करा
निवडणुकीचा ज्वर सुरु झालेला आहे. अफवावर विश्वास ठेवू नका. लातूरमध्ये अफवा लवकर पसरली जात.े त्याकडे दुर्लक्ष करा. ५० वर्षाचा विश्वासाचा, प्रमाणिकपणाचा  मांजरा ब्रँण्ड निर्माण केला आहे. प्रत्येक बूथ प्लस ठेवा. ग्रामपंचायतची निवडणूक समजून ही निवडणूक आपणास लढावी लागेल. समाजातील सर्व जाती-धर्मातील लोकांना भेटा. सर्वजण आपलेच आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंताला आणि गरिबाला एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे, असे सांगून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सगळ्या प्रगतीसाठी आपण धिरज देशमुख यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR