पेण : प्रतिनिधी
रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात अधिकारी असलेला आणि राजकीय पक्षांसोबत लागेबांधे असलेल्या अधिका-यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश बाळकृष्ण पाटील (३१) असे या आरोपी अधिका-याचे नाव असून, पेण पोलिस ठाण्यात ३० वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून योगेश पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी योगेश पाटीलला अटक केली आहे.
देशात कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याचे प्रकरण चर्चेत असताना राज्यात देखील चिमुकलिंच्या आणि महिलांवरील अत्याचाराची मालीकाच सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे.